Essay On Pollution In Marathi – प्रदूषण वर मराठी निबंध

Essay On Pollution In Marathi नमस्कार मित्रांनो आज मि तुम्हाला प्रदूषण वर मराठी निबंध लिहून दिलेला आहे, या निबंधात संपूर्ण माहिती दिलेली आहे जसे की प्रदूषणाचे किती प्रकार आहे ते सांगीतलेय आणि प्रदूषण कमी करण्याचे उपाय देखील सांगितले आहे.

Essay On Pollution In Marathi - प्रदूषण वर मराठी निबंध

Essay On Pollution In Marathi – प्रदूषण वर मराठी निबंध

प्रदूषण हे एक प्रकारचे विष आहे जे पर्यावरण आणि आपले मानवी जीवन दिवसें दिवस नष्ट करत चालले आहे. प्रदूषण हे प्रामुख्याने तीन भागात विभागलेले आहे. वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, आणि जल प्रदूषण. 

वायू प्रदूषण वाहने, कारखान्यांमधून निघनाऱ्या धुराने, धुळीने निघत असल्यामुळे होतो. ध्वनी प्रदूषण हे ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूमुळे होतो. जलप्रदूषण हे कारखान्यामधील प्लास्टिक कचरा, साहित्य आणि इतर वस्तू नद्या आणि तलावात टाकल्यामुळे होते.

जर आपल्याला प्रदूषण कमी करायचे असेल तर आपल्याला आधिकाधिक झाडे लावावी लागतील आणि लोकांना प्रदूषणाबद्दल जागरूक करावे लागेल तरच आपन आपल्या चांगल्या भविष्याची अपेक्षा करू शकतो.

प्रदूषण निबंध 500 शब्दात:

सध्याच्या स्थितित प्रदुषणाने अतिशय भयानक रूप धारण केलेले आहे. मोठ्या शहरांमध्ये आयुष्य खूप कठीन झाले आहे तिथे दरजोज काहीतरी नवीन आजार जन्माला येत आहे.

प्रदूषण इतक्या वेगाने पसरत आहे की त्यामुळे ते आता आपल्या आयुष्याचे भाग झाले आहे. प्रदूषणाने केवळ मानवी जीवनावर परिणाम झाला नाही तर वन्यजीव, प्राणी आणि पृथ्वीच्या वातावरणातही बदल झाला आहे.

प्रदूषणाचे प्रकार

प्रदूषण हे तिन मुख्य भागांमध्ये विभागले गेले आहे, त्याशीवाय प्रदूषणाचे बरेच प्रकार आहेत.

  1. वायू प्रदूषण: वायू प्रदूषण हे वायू हवेमध्ये मिसळल्यामुळे होते. वायू प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे मोटार वहनांमधून निघनारा धूर, कारखाण्यानंमधून निघनारा धूर, सडलेल्यावस्तूच्या वासामुळे, धूळ उडने, फटाके इ.
  2. जल प्रदूषण: पाण्यात रिक्त झालेल्या अनेक प्रकारच्या हानिकारक रसायने, बक्टेरिया इत्यादीमुळे पाण्याचे प्रदूषण होते. नद्यांमध्ये आणि तलावामध्ये कारखान्यांमधून प्रदूषित पाण्याचे स्त्राव होने, नद्यांमध्ये पडनारे गटार, पाण्यात टाकलेले प्लास्टिक हे पाण्याला प्रदूषित करण्याचे कारणे आहेत. अन्य कचरा किंवा सामग्री टाकून जल प्रदूषण होते.
  3. ध्वनी प्रदूषण: वाहनांचा आवाज, लाउडस्पीकर, मशिनीचे आवाज, ढगांची गडगडाट इत्यादीमुळे ध्वनी प्रदूषण होते.

प्रदूषण कमी करण्याचे उपाय:

  • वायू प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावावी तसेच ज्या ठिकाणी झाडे तोडने चालू आहे ते थांबवावेत. वायू प्रदूषण पसरवणाऱ्या उद्योग व्यवसायात नवीन तंत्रज्ञान आणले पाहिजे ज्यामुळे प्रदूषण कमी होईल.
  • जल प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्याला स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. अशे कारखाने बंद केले पाहिजेत जे नद्या तलावांन चे पानी प्रदूषित करतात.
  • ध्वनी प्रदूषण बहुतेक मानवाकडूनच केले जाते, म्हणून जर आपन नियमितपने मशीन्स ची काळजी घेतली तर त्यांचे आवाज उद्भवणार नाहीत आणि प्रदूषण कमी होईल.

प्रदूषण निबंध 100 शब्दात:

प्रदूषण ही केवळ भारताचीच नाही तर जगाची समस्या आहे. पानी, हवा, माती, सगळ्यावर प्रदूषणाचा फटका बसला आहे. प्रदूषणामुळे दरजोज काहीना काही समस्या किंवा आजार उद्भवतात. 

करखान्यांमधून गॅस ची गळती होने, विषारी रसायने, कारखान्यांमधील सांडपाणी यामुळे संपूर्ण वातावरण प्रदूषित होत आहे.

(WHO) जागतिक आरोग्य संघटना वारंवार जगातील सर्व देशांना इशारा देत आहे, परंतु तरीही वाढत्या प्रदूषणावर कठोर करवाई केली जात नाही.

जर आपल्या देशाचे लक्ष जात आणि आरक्षणावर असेल तर भारताला पर्यावरणाविषयी विचार करण्याची वेळ कधी येईल.

जल प्रदूषण निबंध:

पाण्याचे प्रदूषण ही मोठी समस्या आहे. सध्या आपल्या सर्व प्रमुख नद्या जसे की गंगा, यमुना इत्यादी सर्व कचरायुक्त आहेत, ज्यामध्ये विविध प्रकारचे प्लास्टिक व इतर कचरा पडलेला असतो.

काही ठिकाणी असे दिसते की पाण्याऐवजी कचरा वाहू लागला आहे. लोक नद्यांजवळ रोजचे आपले कपडे धुतात ज्यामुळे पाणी दूषित होते. यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे करखान्यांमधून सोडलेले विषारी रसायने नद्या तलावांमध्ये सोडले जाते.

आपल्या देशात प्रदूषित पाणी पिण्यामुळे दर तासाला 73 लोकांचा मृत्यू होतो आणि ही आकडेवारी वर्षानुवर्षे वाढत चालली आहे.

जल प्रदूषण वाढवण्यात आपली सरकारही कमी नाही कारण गटारीतून सोडलेले पाणी अनेकदा नद्यांमध्ये व समुद्रामध्ये सोडले जाते आणि त्यामुळे संपूर्ण पाणी प्रदूषित होते. ह्या विषारी पाण्यामुळे नदीतील सजीवांचे जीवन देखील धोक्यात आले आहे. आणि हे पाणी आपण पिल्याने विविध रोग आपल्याला होतात.

वायू प्रदूषण:

वायू प्रदूषण ही चिंतेची बाब आहे कारण आपल्या देशात दरवर्षी 12.4 लाख लोक वायू प्रदूषणाने मरतात यावरून आपन अंदाज लावू शकतो की आपल्या देशात वायू प्रदूषण हे किती वेगाने वाढत चालले आहे आणि ही आकडेवारी वर्षानुवर्षे वाढत आहे.

सामान्यता कारखाने आणि चिमनीतून निघनारा धूर, कोळश्याचा धूर, घरातून निघनारा धूर, भूसा जाळण्यापासून निघनारा धूर इत्यादीमुळे वायू प्रदूषण होते.

वायू प्रदूषणामुळे दम्याचा रोग, त्वचेचे रोग, डोळ्यात जळजळ होने, हृदय रोग होतात. वायू प्रदूषणामुळे आपल्या वातावरणात परिणाम होतो.

भूमी प्रदूषण:

भूमी प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे मानव थोड्याश्या लोभसाठी प्रदूषणास प्रोत्साहन देतो. कारखान्यांमधून निघनारा कचरा मातीमधे पुरला जातो ज्यामुळे तेथील जमीन हळूहळू नापिक होऊ लागते. 

सध्या प्लास्टिकमुळे माती प्रदूषणाची समस्या उद्भवली आहे कारण प्रत्येक वेळी विषारी द्रव्ये प्लास्टिकमधून बाहेर पडत राहतात आणि यामुळे संपूर्ण जमीन विषारी बनते. 

या सर्वांचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो कारण जमीनीतून उगलेले धान्य, भाज्यांमध्ये विषारी रसायने आढळतात आणि यामुळे मानवी आरोग्य बिघडते म्हणूनच आज बरीच आजार पसरत आहेत.

माझी आई मराठी निबंध | माझे बाबा मराठी निबंध | माझी शाळा निबंध मराठी | दिवाळी वर मराठी निबंध  Small Business ideas in Marathi

2 thoughts on “Essay On Pollution In Marathi – प्रदूषण वर मराठी निबंध”

Leave a Comment